SNDT University : उद्या एसएनडीटी विद्यापीठाचा ७२वा दीक्षांत सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SNDT University

SNDT University : उद्या एसएनडीटी विद्यापीठाचा ७२वा दीक्षांत सोहळा

मुंबई : एसएनडीटी विद्यापीठाचा महिला विदयापीठाचा ७२ वा दीक्षांत सोहळा बुधवारी, १५ फेब्रवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह, चर्चगेट येथे साजरा होणार आहे.

या दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल व विदयापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत समारंभाला संबोधित करतील.

विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव दीक्षांत समारंभ अहवाल सादर करतील. तसेच विदयापीठाच्या प्र-कुलगुरु, प्रा. रुबी ओझा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माहिती कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सात राज्यातील १२ हजार ८०१ महाविद्यालयातील १० हजार ५२५ विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रमाणपत्र पदवी प्रदान केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने १ हजार ७७२ पदवी आणि ९७ पदविका तर पदविका ४०२, प्रमाणपत्र ५ तसेच ५३ विद्यार्थिनींना पीएच.डी, पदवी प्रदान केली जाणार आहे.

तसेच ७२ सुवर्णपदके, १ रौप्यपदके, १ ट्रॉफी व १३४ रोख बक्षिसे देण्यात येतील. यात २१७ पदवी आणि पदविका चार विदयाशाखांच्या अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि अंतःविशयक अभ्यासक्रम प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी यावेळी कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर व संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. संजय शेडमाके आदी उपस्थित होते. एस.एन.डी.टी. महिला विदयापीठामध्ये एकुण ०४ आवार, ३९ विभाग, १३ संचलित संस्था, महाविद्यालये, ५ केंद्र, २०० पेक्षा अधिक संलग्न महाविदयालये आणि तीन स्वायत्त महाविदयालय सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेले आहेत. एस.एन.डी.टी. महिला विदयापीठात १ हजार १०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि ५२ हजार २४९ विदयार्थिनी शिकत असल्याची माहितीही यावेळी कुलगुरू डॉ. चक्रदेव यांनी दिली.