esakal | ठाण्यातील 62 हजार 750 फ्रंट लाईन वर्करसाठी 74 हजार लस
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील 62 हजार 750 फ्रंट लाईन वर्करसाठी 74 हजार लस

ठाणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या फ्रंट लाईन वर्क्रच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी दिली. 

ठाण्यातील 62 हजार 750 फ्रंट लाईन वर्करसाठी 74 हजार लस

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

मुंबईः  ठाणे जिल्ह्यात गेल्या 7 ते 8 महिन्यापासून कोरोना या आजाराने हाहाकार उडवून दिला आहे. त्यात या आजारावर प्रभावी औषध कधी येणार याबाबत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात देखील लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. त्यानंतर प्रत्यक्ष लस कधी येणार याबाबत अनेक अफवा देखील उठल्या होत्या. मात्र आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या एका लाख लसी प्राप्त झाल्या असून यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 74 हजार लसींचे डोस मिळणार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या फ्रंट लाईन वर्क्रच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी दिली. 

देशभरात गेल्या  7 ते 8 महिन्यांपासून हाहाकार उडवून दिल्यानंतर या आजारावर लसी तयार करण्याबाबत अनेक संशोधाकांकडून प्रयत्न सुरु झाले. अशातच अनेक महिन्यांपासून कोरोना या आजारावर लसी तयार करण्यात आल्याचा विविध कंपन्यांकडून दावा देखील करण्यात येत होता. त्यामुळे प्रत्यक्ष लस कधी मिळणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती. असे असताना, मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्ष लसी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्याने रुग्णांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले आहे. यामध्ये ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी एक लाख 3 हजार लसी उपसंचालक आरोग्य विभागकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या लसी तिन्ही जिल्ह्यातील 40 केंद्रांवर लवकरच वितरीत करण्यात येणार आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 74 हजार लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील 29 केंद्रांवर त्यांचे वितरीत करण्यात येणार आहेत. तर पालघर जिल्ह्यासाठी 19 हजार 500 लसी या 6 केंद्रांवर तर, रायगड जिल्ह्यासाठी 9 हजार 500 लसींचे पाच केंद्रांचा समावेश आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका आणि ग्रामीण क्षेत्र मिळून 62 हजार 750 फ्रंट लाईन वर्करची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुधवारी सरकारकडून ठाणे जिल्ह्यासाठी 74 हजार लसी प्राप्त झाल्याने हा साठ पुरेशा प्रमाणात झाल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यात लसीकरणाचा ड्रायरन देखील घेण्यात आला होता. त्याप्रमाणे आता, लसीकरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उप संचालक डॉ.गौरी राठोड यांनी दिली. 

प्रत्येक महापालिकेसाठी 4 ते 5 हजार लस

ठाणे  जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेसाठी यातून प्रत्येकी 4 ते 5 हजार लस दिल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी दिली. त्यानुसार या लस संपूर्ण कोल्ड चेनच्या माध्यमातून त्या त्या महापालिकांच्या ठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर सध्या या लसीचा साठा ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या बाजूला असलेल्या उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे  येथे करण्यात आला आहे. 

हेही वाचा- सोनू सूदला मोठा दिलासा,  निकाल येईपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश 

कोविड 19 आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिलासाठा बुधवारी पहाटे 4.30 वाजता विशेष वाहनाने ठाणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. येत्या 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे. 
राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

ठाणे महानगरपालिकेस जिल्हा प्रशासनाकडून एकूण 19 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. 16 जानेवारी रोजी रोझा गार्डनिया, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या दिवशी एकूण 400 लोकांना लस देण्यात येणार आहे. 
संदीप माळवी, उप आयुक्त, ठामपा.

-------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

74 thousand vaccines for 62 thousand 750 front line workers Thane

loading image