उत्पादनातील 80 टक्के ऑक्सिजन फक्त आरोग्य सेवेकरीता राखीव; राज्य सरकार मध्यवर्ती ऑक्सिजन वितरण व्यवस्था तयार करणार

सुजित गायकवाड
Friday, 11 September 2020

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना संजीवनी ठरलेला ऑक्सिजन वायू यापुढे फक्त अधिकाधीक रुग्णांसाठी वापराला जाणार आहे.

नवी मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना संजीवनी ठरलेला ऑक्सिजन वायू यापुढे फक्त अधिकाधीक रुग्णांसाठी वापराला जाणार आहे. राज्यात उत्पादन घेतल्या जाणारा ऑक्सिजन वायु 80 टक्के आरोग्य सेवेसाठी आणि उर्वरीत 20 टक्के ऑक्सिजन इतर औद्योगिक कामांसाठी राखीव ठेवला जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तशा प्रकारच्या सुचना ऑक्सिजन वायुची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना आणि त्याचे वितरण करणाऱ्या मध्यवर्ती संस्थांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सुविधांचे उद्घाटन करताना दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये घुसणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी; परिसरातील बंदोबस्तात वाढ; तिघांची कसून चौकशी सुरू

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजन ज्याप्रमाणे रुग्णांना लागतो त्याच प्रमाणे तो औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो. ऑक्सजिनची कमतरता पडू नये म्हणून खाजगी रुग्णालयांच्या 80/20 फॉर्म्युलानुसार ऑक्सिजनच्या वापराबाबत नियम तयार केला गेला आहे. राज्यात तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 80 टक्के आरोग्यासाठी व 20 टक्के इतर बाबींसाठी वापरला जाईल. ऑक्सिजनची वितरणाकरीता मंत्रालयस्तरावर एक मध्यवर्ती यंत्रणा तयार केली जाणार आहे अशी माहिती ठाकरे यांनी दिली. गरज नसतानाही खाजगी रुग्णालयांमधील आयसीयु आणि व्हेन्टीलेटरच्या खाटा आडवून ठेवणाऱ्यांना शोधायला हवे. असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. ठाकरे यांनी बोलताना राज्यभरात कोरोनाची सद्यस्थिती स्पष्ट केली. अजूनही नागरीकांना  घराबाहेर पडल्यावर आणि बाहेरून घरी आल्यावर काय केले पाहीजे याबाबत समजत नाही. मात्र सरकार लवकरच त्याबाबत जनजागृतीचे कार्यक्रम पूढील महिनाभरात सरकार सादर करणार आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी उपयुक्त ठरत आहे. मार्च महिन्यापासून राज्यभरात लहान-मोठ्या साडेपाचशे प्रगोयशाळा तयार करण्यात सकारला यश आले आहे. टाळेबंदीच्या काळात उपचारांच्या सुविधा वाढवणे, रुग्णांना शोधणे व उपचार करणे ही कामे प्रशासनाने करायची आहेत. 

मुंबईत पुन्हा कोरोनाचे थैमान; गेल्या 24 तासात 2371 रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी 

नवी मुंबईचे कौतूक 
नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या कोव्हीड केअर हेल्थ सेंटरमधील स्वच्छता गृहात ऑक्सिजन यंत्रणा बसवल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेचे कौतूक केले आहे. तसेच वायफायच्या माध्यमातून रुग्णांना व्हिडीओ कॉलची सुविधा दिल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. अनेकदा बरा झालेला रुग्ण स्वच्छतागृहात गेल्यावर अचानक ऑक्सिजन कमी झाल्यामुळे दगावला आहे. ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्याने ठाकरे यांनी कौतूक केले. तसेच व्हिडीओ कॉल केल्यामुळे कुटुंबियांना त्यांच्या रुग्ण नातेवाईकाला पाहता येते. त्यामुळे मनाचे समाधान होऊन नातेवाईकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. असे ठाकरे यांनी सांगितले. तसेच कोव्हीड केंद्रातील रुग्णांना टीव्हीवरच्या बातम्या दाखवू नका असे आवर्जून सांगण्यास ठाकरे विसरले नाहीत. 

पुर्ण शुल्क वसूल करणाऱ्या शाळांचे 7 वर्षाचे ऑडिट करा; बच्चू कडू यांचे आदेश

जम्बो फॅसीलीटीवरील विश्वास वाढवा

जम्बो फॅसीलीटी केंद्रावरील लोकांचा विश्वास वाढवणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन ताण वाढवण्याची गरज नाही. सरकारने महापालिकेच्या माध्यमातून तयार केलेल्या जम्बो फॅसिलीटी रुग्णालयांकडे रुग्णांना आणा.  जम्बो फॅसिलीटी असणाऱ्या फिल्ड रुग्णालयांबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहीजे. ताण कमी करायचे असेल तर फिल्ड रुग्णालये खाजगी रुग्णालयांना दत्तक घ्यायला तयार करा. त्यांचे तज्ञ, डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा दत्तक घेता येईल का हे जास्तीत जास्त पाहणे गरजेचे आहे.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 percent of the oxygen in the product is reserved for health care only