कोरोनाचा कहर! महापालिका मुख्यालयातील 9 कर्मचारी पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

मुंबई महापालिका मुख्यालयातील 9 कर्मचाऱ्यांना गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाची बाधा झाली. कोरोनाबाधित विशेष अधिकाऱ्याच्या संपर्कातील एका सनदी अधिकाऱ्याचीही कोरोना चाचणी करण्यात आली; मात्र अहवाल निगेटिव्ह आला आहे

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील 9 कर्मचाऱ्यांना गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाची बाधा झाली. कोरोनाबाधित विशेष अधिकाऱ्याच्या संपर्कातील एका सनदी अधिकाऱ्याचीही कोरोना चाचणी करण्यात आली; मात्र अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे कर्मचारी कार्यरत असलेले विभाग सील करण्यात आले आहेत.

मोठी बातमी ः ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत 234 नवे रुग्णांची नोंद

महापालिका मुख्यालय आणि परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या इमारतीत आरोग्य विभागाचेही कार्यलय असून, एक कार्मचारी या विभागातील आहे. महापालिका मुख्यालयातील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी समोर आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील तीन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनाही लागण झाल्याचा अहवाल आला. त्यापैकी एकाला कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतरांवर मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोठी बातमी ः नियम तोडून कोरोनाबाधित मृतदेहाला घातली आंघोळ, पुढे काय झालंय तुम्हीच वाचा...

आपात्कालीन नियंत्रण कक्षातील आणखी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मिळकत आणि विकास नियोजन विभागांतील प्रत्येकी एका अधिकाऱ्यासह एका विशेष अधिकाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. हा विशेष अधिकारी महापालिकेचा पूर्ण वेळ कर्मचारी नाही. कोरोनाच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी असल्यामुळे हा विशेष अधिकारी काही सनदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. त्यामुळे संबंधित सनदी अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली; मात्र त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 employees of bmc came corona positive on thursday