मुंबईत गेल्या २४ तासांत 910 नवीन रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे
Thursday, 6 August 2020

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली असून आज 910 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1,20,165 झाली आहे. तर आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,645 वर पोचला आहे. मुंबईत आज 988 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे. 

मुंबई  : मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली असून आज 910 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1,20,165 झाली आहे. तर आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,645 वर पोचला आहे. मुंबईत आज 988 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे. 

 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत सुरू होतेय 'पोस्ट कोव्हिड ओपीडी'; जाणून घ्या सविस्तर माहिती...

मुंबईत आज नोंद झालेल्या 57 मृत्यूंपैकी 41 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 20 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 57 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 30 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 25 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 988 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 92,661 रुग्णांना घरी सोडण्यात आले.                                                         

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 80 दिवसांवर गेला आहे. तर 5 जुलै पर्यंत एकूूूण 5,74,919  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  30 जुलै ते 5 ऑगस्ट जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.87 इतका आहे. 

सुरक्षा दलाती जवानांचे भविष्य वाऱ्यावर; मृत जवानाला ना वीमा कवच -

मुंबईत 619 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,661 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 4,592 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 4,097 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.
----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 910 new patients added in Mumbai in last 24 hours; Read other detailed statistics