
Increased Diabetic Patients in Mumbai: मुंबईत मधुमेहाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत २०१४ ते २०२२ या कालावधीत मधुमेहामुळे तब्बल ९१,३१८ रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे २०२२ मध्ये मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या २,५४४ होती, ती २०२२ मध्ये १४,२०७ इतकी वाढल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आले आहे.