क्या बात! 96 वर्षांच्या आजीबाईंची २२ दिवसात कोरोनावर मात

भाग्यश्री भुवड
Wednesday, 2 September 2020

96 वर्षाच्या आजी ( नाव मालती दुर्वे ) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार होता आणि त्या कोरोना पॉझिटीव्ह झाल्या. त्यांनी २२ दिवसात कोरोनावर मात केली आहे.

मुंबईः  जागतिक पातळीवर कोरोना विषाणूमुळे कहर निर्माण झाला असून अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमित प्रकरणांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर मृत्यूंमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात पॉझिटिव्ह कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या आता 3 कोटी 62 लाख 4 हजार 613 च्या वर आहे, मात्र आनंदाची बातमी म्हणजे भारतात कोरोनातून बरे होण्याचा दरही वेगाने वाढत आहे.  

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त कोविड रुग्ण असलेले राज्य आहे. असे जरी असले तरी कोरोना संक्रमणातून 90 वर्षांवरील वृद्धही नागरिक बरे होत आहेत. अशाच एक 96 वर्षाच्या आजी ( नाव मालती दुर्वे ) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार होता आणि त्या कोरोना पॉझिटीव्ह झाल्या. त्यांनी दिवस मुलुंडच्या अपेक्स रुग्णालयात आयसीयूमध्ये राहून कोरोना व्हायरसशी यशस्वीपणे लढा दिला आहे. आधीच वयासोबत येणाऱ्या आजारांमुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोरोना पॉझिटीव्ह होणे आणि त्यातून त्यांना वाचवणे हे डॉक्टरांसमोर एक मोठे वैद्यकीय आव्हान होते.

अधिक वाचाः  नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

फुफ्फुसांच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या 96 वर्षाच्या आजी अत्यंत गंभीर स्थितीत आल्या होत्या. कोविड 19, न्यूमोनिया आणि श्वसन बिघाडासह सर्दी खोकला याची लागण तसेच शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाली होती.  9 ऑगस्ट या दिवशी आजी दाखल झाल्या होत्या. तातडीने आयसीयूमध्ये दाखल करून बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर ठेवले.  वैद्यकीय चाचण्यांमधून त्यांच्या  फुफ्फुसांचे 45% नुकसान झाल्याचा रिपोर्ट आला होता. 

डॉ. हार्दिक ठक्कर ,संसर्गजन्यरोगतज्ञ, सल्लागार एमडी फिजिशियन, अ‍ॅपेक्स रुग्णालय

10 जणांच्या टीमने दिवसरात्र त्यांच्यावर लक्ष ठेवले. तब्बल 19 दिवसांनंतर आयसीयूच्या बाहेर आल्या. सामान्य वॉर्डमध्ये आणखी 3 दिवस ठेवल्यावर त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली, त्यानंतर 22 व्या दिवशी ऑक्सिजनसह घरी सोडण्यात आले.

हेही वाचाः  मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

या आजारांच्या रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक

वयोमानानुसार शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वृद्ध व्यक्तीना  कोरोनाव्हायरसच्या बाबतीत अधिक धोका असतो. त्यातच  हृदयरोग, फुफ्फुसाचा रोग, आणि मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा रोग असेल आणि कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला  तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जगभरात कोरोना या साथीच्या उद्रेकात बळी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या आजाराचा धोका सर्वाधिक वृद्ध व्यक्तींना असल्याचेही तज्त्र डॉक्टर्स सांगतात.

(संपादनः पूजा विचारे)

96-year-old grandmother defeated Corona in 22 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 96-year-old grandmother defeated Corona in 22 days