नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २८२ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २६,४३१ झाली आहे. दरम्यान नवी मुंबई महापालिका भागात ३३ कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. नवी मुंबईतल्या शहरात ३३ कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. 

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू ठेवण्याचा आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे. याआधी आयुक्तांनी शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. 

आयुक्तांनी खालीलप्रमाणे नवी मुंबईतल्या नागरिकांसाठी सूचना दिल्या आहे.

  • नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये किमान 2 फुटाचे अंतर असावे. दुकानदारांनी ग्राहक सोशल डिस्टनसिंगचे पालन करणं बंधनकारक असेल.
  • सार्वजनिक आणि खाजगी समारंभात 20 ते 50 जणांचा समावेश असावा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे केल्यास दंड आकारण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास सक्त मनाई असेल.
  • नागरिकांनी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम पद्धतीचे पालन करावं.
  • कामाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटाईजरची व्यवस्था प्रवेशद्वार आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावर तसेच इतर आवश्यक ठिकाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेणं आवश्यक आहे.
  • कार्यालयातील कामकाजाची ठिकाणे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावी.
  • कामाच्या ठिकाणी तसेच जेवणाच्या सुट्टीमध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहील याची दक्षता घ्यावी.

मंगळवारी बेलापूर ४३, नेरुळ ५३, वाशी ५६, तुर्भे ३८, कोपरखैरणे ३३, घणसोली ४५, ऐरोली ११, दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४८, नेरुळ ५२, वाशी ३४, तुर्भे ३०, कोपरखैरणे ३५, घणसोली ३०, ऐरोली ८ आणि दिघामधील ५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२३५० पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५९५ झाला आहे.नवी मुंबईत सध्या ३४८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे.

Navi mumbai lockdown 33 containment zone till 31st september abhijit bangar decision

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com