a journey of love sonia gandhi book
sakal
मुंबई - दिवाळीच्या सणात प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटांच्या धामधुमीत प्रकाशित झालेले काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. आणीबाणीसह राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार असलेल्या या पुस्तकावरून सध्या देशभरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काही दिवसांतच प्रत्यक्ष विक्रीबराेबरच ऑनलाइन विक्रीचा नवा मापदंड या पुस्तकाने निर्माण केला. अलीकडच्या काही वर्षांत सर्वाधिक उत्सुकता वाढवणारे पुस्तक बाजारात आल्याचे प्रकाशन क्षेत्रातील जाणकारांनी मत व्यक्त केले.