esakal | ताडदेव आरटीओतील एजंट, दलालांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

RTO

ताडदेव आरटीओतील एजंट, दलालांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Taddev RTO ) एजंट आणि दलालांवर पोलीस कारवाई (Police Action) करण्यासाठी आरटिओला प्रदीप शिंदे (Pradeep shinde) यांनी ताडदेव पोलीस ठाण्याला पत्र पाठवले आहे. शुक्रवारी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी (Avinash Dhakane) ताडदेव आरटिओला सप्राइज भेट दिली होती. त्यानंतर शिंदे यांनी या कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आरटीओ कार्यालय परिसरातील उपहार गृहाच्या पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन सुद्धा फोडण्याच्या सूचना आयुक्तांनी (RTO Commissioner) दिल्या असून,अनुपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना रजा दिली होती. ( A letter to Taddev RTO for Action on RTO Agents )

हेही वाचा: लोकल चालवा, गरिबाला जगवा

परिवहन आयुक्तांनी 2 जुलै रोजी तातदेव आरटीओ कार्यालयाची सकाळी 10 वाजता अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली, दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. दरम्यान दलालांचे टेबल, खुर्च्या परिसरात आढळून आल्याने आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या तर आरटीओ परिसरातील एका उपहार गृहात स्वतंत्र वीज आणि पाणी वापरत नसल्याने त्यांची वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा सूचनाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आयुक्तांच्या भेटीनंतर आता आरटीओ शिंदे यांनी एजंट आणि दलालांवर सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्रच ताडदेव पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. आयुक्तांच्या सुचनांवरून ही कारवाई करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही कारवाईचा इशारा

कार्यालयात वेळेवर हजर राहणे, विनापरवानगी गैरहजर न राहणे, विनापरवानगी मुख्यालय न सोडणे इत्यादीबाबत स्पष्ट निर्देश यापूर्वी आरटीओने दिले आहे. अन्यथा अनुपस्थितांच्या विरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा इशारा आरटीओ शिंदे यांनी परिपत्रक काढून दिला आहे.

loading image