esakal | लोकल चालवा, गरिबाला जगवा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai local

लोकल चालवा, गरिबाला जगवा

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : राज्य सरकारने (State Government) गरिबांसाठी (Poor People) लोकल प्रवास खुला करावा. गरिबांना जगण्यासाठी आधार द्यावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. मंगळवारी, (ता.6) रोजी चर्चगेट येथे जनता दल सेक्युलर पक्षाच्यावतीने जोरदार आंदोलन (Strike at Churchgate) करण्यात आले. ही केवळ सुरूवात असून सरकारने गरिबांची मागणी मान्य न केल्यास गरीब वस्त्यांमधून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे (Ravi bhilane) यांनी दिला. (Mumbai Local train lifeline for poor people do start let live poor)

हेही वाचा: आमदार प्रताप सरनाईक यांना मनी लाॅड्रिंग प्रकरणात तात्पुरता दिलासा

मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे गरिबांची रोजी रोटी संपुष्टात आली असून लोकल बंद असल्यामुळे गरिबांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. वसई, विरार, पालघर, कर्जत, कसारा इथून मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना रोजगार गमवावा लागत आहे. त्यांच्या चुली पेटाव्यात म्हणून तरी महिलांसाठी दिवसातील किमान दोन किंवा चार तास लोकल खुली करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांनी केली.

loading image