Mumbai Crime : कौटुंबिक वादातून अल्पवयीन मुलीने कापली हाताची नस! पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून...

Police
Police esakal

मुंबई : मुंबई पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने एका 16 वर्षीय मुलीचे प्राण वाचले आहेत. कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या वादानंतर पीडित मुलीने मनगटावर धारधार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 3 जून रोजी खार येथील एका धर्मशाळेत घडल्याची माहिती मिळत आहे.

Police
Triple Talaq : सोशल मीडियावर रिल बनवले म्हणून पत्नीला दिला ट्रीपल तलाख! आरोपी पतीवर गुन्हा दाखल

या धर्मशाळेत राजस्थानमधील मुलीचे कुटुंब वास्तव्यास होते. 3 जून रोजी पीडीत मुलीचा काही कारणास्तव तिच्या कुटुंबीयांशी वाद झाला. या वादात रागाच्या भरात ब्लेडने 16 वर्षीय मुलीने मनगट चिरले.

या नंतर मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी खार पोलिसांशी संपर्क साधला आणि निर्भया पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. पथकातील एका महिला कॉन्स्टेबलने जखमी मुलीला पोलिस व्हॅनमध्ये नेले आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल पथकातील अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com