esakal | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल (Petetion) करण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) लिहिलेल्या पत्रातील आरोपांवर ही याचिका आहे. वाझे सध्या पोलीस कोठडीत असून अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने लिहिलेल्या पत्रात गुटखा व्यापारी दर्शन घोडावत यांच्याकडून शंभर कोटी वसूल (Hundred Crore) करण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे. घोडावत हे पवार यांचे निकटवर्तीय आहेत, असा उल्लेख या पत्रात आहे. त्यामुळे पवार यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. वकिल रत्नाकर डावरे यांनी ही याचिका केली आहे. ( A petition Against Deputy Chief minister Ajit Pawar in Mumbai High Court)

हेही वाचा: BMCचा मुन्नाभाई; दुसऱ्याच्या नावाने २८ वर्षे पालिकेत काम करून कमावले लाखो रुपये

वाझेने रिमांड दरम्यानच्या सुनावणीमध्ये हे पत्र विशेष न्यायालयात दिले होते. मात्र विशेष न्यायाधिशांनी पत्र दाखल करून घेण्यासाठी नकार दिला होता. नियमित कायदेशीर प्रक्रियेनुसार बाजू मांडावी, अशी सूचना न्यायालयाने केली होती. या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे पवार आणि परब यांच्या चौकशीची मागणी याचिकादाराने केली आहे. लवकरच नियमित न्यायालयात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

loading image