esakal | BMCचा मुन्नाभाई; दुसऱ्याच्या नावाने २८ वर्षे पालिकेत काम करून कमावले लाखो रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMCचा मुन्नाभाई; दुसऱ्याच्या नावाने २८ वर्षे पालिकेत काम करून कमावले लाखो रुपये

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई: मागच्या २८ वर्षांपासून मुंबई महापालिकेत (BMC) माळी (Gardner) म्हणून काम करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्यावर (Fake Employee) आझाद मैदान (Azad maidan Police) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. महापालिकेतील एका शिपायाच्या (Peon) कागदपत्रांच्या झेरॅाक्सचा वापर त्याने केला होता. शाळेतील इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण असणाऱ्या या बोगस कर्मचाऱ्याने महापालिकेच्या माध्यमातून तब्बल ४३ लाख रुपयांची कमाई केली आहे. तो कर्मचारी ५ सप्टेंबर २०१७ पर्यंत महापालिकेत माळी म्हणून काम करत होता. त्याने दिलेल्या जातीचा दाखला (Cast Certificate) व इतर कागदपत्रांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी छाननी केली. त्यानंतर ती कागदपत्रे महापालिकेत काम करणाऱ्या सोपान मारुती साबळे या शिपाई कर्मचाऱ्याच्या कागदपत्रांसारखीच (Documents) असल्याचे समोर आले. त्यानंतर माळी म्हणून काम करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश झाला. असे वृत्त मिड डे मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ( Fake Employee earned forty three lac rupees being Fake Employee Of BMC-nss91)

हेही वाचा: BMC : अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरी लसीकरण, 'या' ईमेलवर माहिती द्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८९ मध्ये सोपान साबळे महापालिकेत शिपाई कर्मचारी म्हणून कामावर रुजू झाले. त्यानंतर १९९३ मध्ये साबळे यांच्याच नावाने एक कर्मचारी माळी म्हणून कामावर दाखल झाला. त्याची आणि साबळे शिपाईची कागदपत्रे एकसारखीच होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या माळी कर्मचाऱ्याला खरी कागदपत्रे सादर करण्यास सांगितली. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१७ पासून त्याने कामावर यायचे बंद केले. त्यानंतर महापालिकेकडून त्याने दिलेल्या पत्त्यावर एक पत्र पाठवले. मात्र ते पत्र साबळे यांच्या घरच्या पत्त्यावर पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आणि त्या माळी कर्मचाऱ्याने फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर महापालिकेचे अधिकारी सुनिल जंगले यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या बोगस कर्मचाऱ्याने तब्बल 43, 31,010. रुपयांची महापालिकेची फसवणूक केली असल्याची माहिती जंगले यांनी पोलिसांना दिली. "आपीसीच्या कलम ४१९ आणि ४२० अंतर्गत बोगस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती आझाद मैदान पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भूषण बेलनेकर यांनी दिली आहे.

loading image