मुंबईत BKC मध्ये निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला, १४ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत BKC मध्ये पुलाचा भाग कोसळला, १४ जण जखमी

मुंबईत BKC मध्ये पुलाचा भाग कोसळला, १४ जण जखमी

मुंबई: मुंबईत वांद्रे पूर्वला बीकेसी (Mumbau bkc) ट्रेड सेंटरजवळ बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपूल पुलाचा (under construction flyover) काही भाग आज पहाटेच्या सुमारास कोसळला. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी पुलावर 20 ते 25 मजूर काम करत होते.

पुलाचा भाग कोसळत असताना, काहीजण तिथून निसटण्यात यशस्वी ठरले. आठ ते दहा मजुर जवळच्या नाल्यात पडले. जे जखमी आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी आहे. पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकल्याची शक्यता नाहीय, असं आपत्कालीन विभागाच म्हणणं आहे.

हेही वाचा: लोकशाहीच्या इतिहासातले दुर्मीळ व्यक्तिमत्त्व

जखमी व्यक्तींची नावे

अनिल सिंह (२८), अरविंद सिंह (२९), अझर अली (२६), मुस्तफ अली (२८), रियाझुद्दीन (२३), मोताब अली (२८), रियाझु अली (२१), श्रावण (४९), अतिश (२२), अली (२२), एझाझ-उल-हक (२९) परवेझ (२२), अकबर अली (२५), श्रीमंत (२५)