esakal | तुटलेल्या हाताला अवघड शस्त्रक्रियेतून केले सजीव ! डॅाक्टरांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

joint hand

तुटलेल्या हाताला अवघड शस्त्रक्रियेतून केले सजीव ! डॅाक्टरांना यश

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबई पालिकेच्या (BMC) सायन रुग्णालयात (Sion Hospital) महिलेच्या छातीत आरपार गेलेली सळई यशस्वी शस्त्रक्रिया (Successful Surgery ) करून काढण्यात आल्याची घटना नुकतीच ताजी असतानाच, अपघातात (Accident) एका व्यक्तीचे हातापासून वेगळा झालेला तळवा शस्त्रक्रियेने पुन्हा जोडला गेल्याचे रुग्णालयात प्रशासनाकडून (Hospital Authorities) सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) देखील पालिकेच्या रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया होत आहेत. ( A tough surgery done in sion Hospital Broken bones hand joints again-nss91)

दरम्यान शास्त्रक्रिये नंतर या रुग्णाचे दोन्‍ही हात सामान्य पद्धतीने काम करत असून या रुग्णाच्या हातांच्या हालचालीसाठी डाॅक्टरांकडून फिजिओथेरपी दिली जात असल्याचे सांगण्यात आले. ३९ वर्षीय पुरुष एका रस्ते अपघातात जखमी झाला होता. त्या व्यक्तीचे हातांचा तळवा हातापासून वेगळा झाला होता. ही व्यक्ती सायन रूग्णालयात दाखल झाल्यावर १९ मे रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेमुळे अपघातग्रस्ताच्या दोन्ही हातांनी लवकर हालचाल करण्यास सुरुवात केली आहे असे सायन रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Traffic Police: नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दणका, दीड कोटींचा दंड वसूल!

या शस्त्रक्रियेत इ वाॅर्ड मधील टीमने मोठी कामगिरी बजावली आहे. विभाग प्रमुख डॉ. जगनाथन, सर्जरी प्रमुख डॉ. अमर मुनोळी, डॉ. सारिका मयेकर आणि भूलतज्ज्ञ डाॅ. गीता पारकर यांच्या टीमसह अनेक डाॅक्टरांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान, ही सकारात्मक बाब असल्याची प्रतिक्रिया सायन रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिली आहे.

अपघाता नंतर गेलेला वेळ, चेचलेल्या हातातील हाड आणि रक्त वाहिन्या जोडण्याचे आव्हान होते. रक्त वाहिन्या योग्य जोडल्यास जोडलेल्या हात सजीव होऊ शकणार होता. शिवाय संवेदना येण्यासाठी दोन नर्व्ह शिवाय ३० ते ३५ तंतू जोडण्याचे आव्हान होते.

- डॉ. अमर मुनोळी, सर्जरी प्रमुख. सायन हॉस्पिटल.

loading image