esakal | नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, दीड कोटींचा दंड वसूल!
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

Traffic Police: नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दणका, दीड कोटींचा दंड वसूल!

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Traffic Rules) करणाऱ्यांविरुद्ध ई-चलानद्वारे जारी झालेला थकीत दंड वसुल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) चालकांच्या घरी नोटीस (Notice) बजावण्यास सुरवात केली होती. त्या अंतर्गत आता महिन्याभरात दीड कोटी रुपयांचा दंड (Fine) वसूल करण्यात आला आहे. सुमारे पाच हजार चालकांकडून (Drivers) हा दंड वसूल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. महिन्याभरापूर्वी 10 हजाराहून अधिक रकमेचा दंड थकलेल्या चालाकांच्या घरी जाऊन वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरूवात केली होती. त्या अंतर्गत 9018 चालकांना नोटीस बजावण्यात (Notice Issue) आली होती. गेल्या महिन्याभरात पोलिसांनी दीड कोटी रुपये जमा केले आहेत. ( Traffic Police Collected Dews Fine at vehicle Drivers home through notice - nss91)

अद्याप चार हजाराहून अधिक चालकांनी ही रक्कम भरण्यासाठी काही कालावधी मागितला आहे. 20 हजारांहून अधिक दंडाची रक्कम असलेल्या अनेक चालकांनी दोन टर्ममध्ये पैसे भरण्याची परवानगी मागितली आहे. त्यांची पैसे भरण्याची तयारी असल्यामुळे त्याना तेवढी सवलत देण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. 2019 च्या फेब्रुवारी महिन्यापासून ई चलनच्या माध्यमातून दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या हातातील पावती पुस्तक जाऊन हातामध्ये मशीन आल्यानं नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील दंडात्मक कारवाईच्या संख्येतही वाढ झाली.

हेही वाचा: महापालिका विरोधी पक्षनेते पदाची भाजपची पुनर्विचार याचिका फेटाळली - SC

परंतु, दुसरीकडे दंडाची थकबाकी प्रचंड वाढू लागली. वाहनमालक दंड भरत नसल्यानं अनेक गाड्यांवरील थकीत दंडाची रक्कमही मोठी आहे. प्रलंबित दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने विशेष मोहिम राबवली होती. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यासाठीच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्यानं रस्त्यावरील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होण्याचंही प्रमाण वाढलं आहे. 10 हजार किंवा त्यापेक्षा अधिक प्रलंबित असलेला दंड वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा वाहतूक शाखेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहिम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे.

loading image