esakal | गिरगाव चौपाटी जवळचं प्रसिद्ध 'क्रिस्टल' हॉटेल बंद होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

crystal hotel

गिरगाव चौपाटी जवळचं प्रसिद्ध 'क्रिस्टल' हॉटेल बंद होणार?

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई : गिरगाव चौपाटीजवळ (Girgaon beach) असलेली एक इमारत (MHADA) म्हाडाने धोकादायक इमारत (Dangerous Building) म्हणून घोषित केली आहे. ही इमारत राहण्यासाठी धोकादायक घोषित झाल्यामुळे इथे असलेलं प्रसिद्ध 'क्रिस्टल' हॉटेल (crystal hotel) बंद होऊ शकतं. खाद्यप्रेमींची पसंती लाभलेलं 'क्रिस्टल' हे गिरगावमधील एक जुनं आणि लोकप्रिय हॉटेल आहे. गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या इमारतीत हे 'क्रिस्टल' रेस्टॅारंट आहे. हे हॉटेल १९६६ साली सुरु करण्यात आलं होतं. मागच्या ५० वर्षांपासून या रेस्टॅारंटमध्ये उत्तम चविष्ट उत्तर भारतीय पद्धतीचे खाद्यपदार्थ (North Indian Fare) मिळतात. 'क्रिस्टल' हॉटेल असलेली ही इमारत जीर्ण झाली असल्याचे म्हाडाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे येथे असणाऱ्या भाडेकरुंना इमारतीला असलेला धोका लक्षात घेवून इमारत सोडण्याची नोटीस (MHADA notice) म्हाडाने बजावली आहे. परंतु, येथील ९ भाडेकरुंनी ही इमारत जीर्ण झाली नसून तीची दुरुस्ती होऊ शकते, असा दावा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ( A well known crystal hotel near girgaon beach may shut down)

म्हाडाकडून करण्यात आलेली कारवाई थांबविण्यासाठी या भाडेकरुंनी मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. ए.आर. रांगनेकर मार्गावरील बिल्डींग नंबर '३१सी-३३' 'सी-१' मध्ये येत असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. याचाच अर्थ ही इमारत जीर्ण झाली आहे. परंतु, भाडेकरुंनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये ही इमारत सी-२बी विभागात येते. त्यानुसार या इमारतीची दुरुस्ती केली जाऊ शकते. अन्य ३३ व्यावसायिक गाळयांसह क्रिस्टल रेस्टॅारंट या इमारतीत आहे.

हेही वाचा: मुंबई : एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

''ही इमारत २०२०-२१ मध्ये सर्वात धोकादायक आणि जीर्ण असल्याचं तेथील व्यावसायिकांना कळवण्यात आलंय. इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली असल्याने तेथील कार्यालये तातडीने रिकामी करण्याची विनंती करण्यात आली आहे. तेथील व्यवसायिकांना दुसऱ्या पर्यायी जागी जाण्याचेही सांगण्यात आले आहे. जर येथील व्यावसायिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता त्याच इमारतीत राहण्याचे ठरवले. तर भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास यासाठी सर्वस्वी तेच जबाबदार असणार'' असं म्हाडाने मागील आठवड्यात दिलेल्या नोटीशीत म्हटलं आहे.

''आम्ही दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटनुसार ही इमारत 'सी-२बी' विभागात येते. म्हाडाला याबद्दल आधीच सांगण्यात आले आहे. म्हाडाने आम्हाला दुरुस्ती करण्याचा खर्च अंदाजे ९ लाख रुपये सांगितला आहे आणि दोन वर्षात दुरुस्तीची रक्कम ५५ लाखापर्यंत पोहोचली आहे" अशी माहिती क्रिस्टलचे मालक संजय मेहरा यांनी दिली आहे. म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

loading image