esakal | एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल; राजकीय हेतूनं कारवाईचा केला आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसे

मुंबई : एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे गुरुवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात दाखल झाले. ईडीनं त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं तसेच कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीमध्ये जमीन खरेदी प्रकरणात त्यांना ईडीने समन्स बजावलं होतं. दरम्यान, आपल्याविरोधातील ही केस राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप खडसे यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर केला. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Pune land deal Eknath Khadse reaches ED office)

हेही वाचा: ईडीच्या चौकशी हेतूवरच संशय - खडसे

ईडीनं बुधवारी एकनाथ खडसे यांना समन्स बजावून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी ईडीने खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना मंगळवारी चौकशी केल्यानंतर रात्री उशीरा अटक केली होती.

हेही वाचा: "खडसेंना सन्मानाने राष्ट्रवादीत घेतल्यामुळेच भाजपचा तिळपापड"

दरम्यान, ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले, "मी ईडीला चौकाशीसाठी सहकार्य करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की नक्की काय घडतं आहे. सर्वांना माहिती आहे की मला ईडीनं पाठवलेलं समन्स राजकीय हेतूने प्रेरित आहे. यापूर्वीच माझी पाच वेळा चौकशी झाली आहे. आता पुन्हा चौकशी होत आहे. अँटी करप्शन ब्युरोनं माझ्याविरोधात या प्रकरणी कोणताही पुरावा नसल्याचं आधीच सांगितलं आहे."

loading image