धक्कादायक: वरळीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Worli Hit and Run

धक्कादायक: वरळीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडलं

वरळी सी फेस जवळ एका भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेल्या चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे ही घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार, अपघात एवढा भीषण होता की महिला अनेक फूट उडून पडली यात तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.यामध्ये कारचा चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार, अपघात एवढा भीषण होता की महिला अनेक फूट उडून पडली यात तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला यावेळी अपघात ग्रस्त कारचा वेग १२० किलो प्रतितास इतका असल्याची माहिती मिळत आहे. महिलेल्या चिरडल्यानंतर कार रस्त्याशेजारी असलेल्या कठड्याला धडकली. या अपघातात कारच्या पुढच्या भागाचा चुरा झाला आहे.

वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे ठार

नाशिक शहरात वेगवेगळ्या परिसरात घडलेल्या अपघाती घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात दोन घटनांमध्ये दुचाकीस्वाराचा तर एक घटनेत पादचारी युवकाचा समावेश आहे. पहिल्या घटनेत टेम्पोने धडक दिल्याने पादचारी युवक ठार झाल्याची घटना सातपूर येथील सीएट कंपनीसमोर घडली.

या अपघातात शुभम यशवंत बच्छाव (१९, रा. सातपूर) याचा मृत्यू झाला. शुभम हा शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी कामावरून घरी जात असताना भरधाव टेम्पोने (एमएच १५ जेसी ०५८७) शुभमला धडक दिली. त्यात शुभमचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात टेम्पोचालक रोहिदास रामदास वाघ (रा. श्रमिकनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :accident