esakal | आदित्य ठाकरेंची मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक, अक्षयकुमारही उपस्थित, चर्चा गुलदस्त्यात...
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरेंची मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक, अक्षयकुमारही उपस्थित, चर्चा गुलदस्त्यात...

अक्षय कुमारने पोलिस कर्मचाऱ्यांना घड्याळे भेट देण्यासाठी, आदित्य ठाकरे आणि पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

आदित्य ठाकरेंची मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक, अक्षयकुमारही उपस्थित, चर्चा गुलदस्त्यात...

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मुंबई पोलिस आयुक्तांसोबत आज बैठक झाली, यावेळी अभिनेता अक्षयकुमार उपस्थित असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप नेते याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआय कडे देण्याची मागणी करत असताना, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बैठक झाली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. 

अक्षय कुमारने पोलिस कर्मचाऱ्यांना घड्याळे भेट देण्यासाठी, आदित्य ठाकरे आणि पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

मोठी बातमी - तीन हजार किलोमीटरची भरारी आणि अखेर मुंबईत सोडले प्राण, GPS वरून समजलं पक्षी साऊथ आफिकेतून आलेला...

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशी मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिस सक्षम असल्याचे ठणकावून सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि परमवीर सिंह-अक्षय कुमार यांच्यातील बैठकीला महत्त्व आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबतच्या तपशीलाकडे सर्वांचे लक्ष आहे.

( संपादन - सुमित बागुल )

aaditya thackeray met mumbai police commissioner parambir singh with akshay kumar 

loading image