Mumbai University : उद्या परीक्षा अजून हॉल तिकीटही नाही, विद्यापीठाचा कारभारावरून आदित्य ठाकरे संतापले!

Aaditya thackeray slam chandrakant patil over mumbai university exam BA students did not get hall ticket day before exam
Aaditya thackeray slam chandrakant patil over mumbai university exam BA students did not get hall ticket day before exam

मुंबई : मुंबई विद्यापीठातील बीए विभागाच्या तृतिय वर्षाची परीक्षा ही उद्यावर येऊन ठेपली आहे मात्र अद्याप विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षेचे ठिकाण आणि आसन क्रमांक मिळाले नसल्याने परीक्षेला कसे बसणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षच्या सेमिस्टर 6 च्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीट मिळालेले नाही! त्यांना त्यांचे सेमिस्टर 5 निकालही मिळालेले नाहीत.

Aaditya thackeray slam chandrakant patil over mumbai university exam BA students did not get hall ticket day before exam
Shiv Sena : गोमूत्रधारी चंद्रकांत…; उद्धव ठाकरेंचा झाला घोळ, पाटलांवर टीका करताना घेतलं KKR च्या कोचचं नाव

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बगल दिली असताना, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपल्या वक्तव्याने आणि महाराष्ट्रविरोधी सरकारचा एक भाग बनून महाराष्ट्राचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहेत. त्यांचे मंत्रालयाचे काम किती लाजिरवाणे आहे. युवासेनेने विद्यापीठाकडे ते उचलून धरले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Aaditya thackeray slam chandrakant patil over mumbai university exam BA students did not get hall ticket day before exam
Aaditya Thackeray : राजकारणात खळबळ करण्याची क्षमता असणाऱ्या दोन युवराजांची भेट, भावी युतीची नांदी?

उच व तंत्रशिज्ञण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडली त्या घटनेत बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचा काही संबंध नव्हता असं वक्तव केलं, या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे सध्या नवा वाद सुरू आहे. याचाच संदर्भ देत आदित्य ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com