
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासह आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने, मोर्चे केले आहेत. तरीही राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. मराठा विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकर भरतीतील मराठा आरक्षणातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ होत आहेत.
मुंबई ः केंद्र व राज्य सरकार सामाजिक हितासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ठोस निर्णय घेऊन न्याय देत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे 7 नोव्हेंबरपासून मराठा आरक्षण पायी दिंडी आक्रोश मोर्चा पंढरपूर ते मंत्रालय निघणार आहे, अशी माहिती आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत दिली.
बिहार निवडणुकीसाठी नवी मुंबईतून जाणार भाजपची कुमक
महेश डोंगरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासह आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने, मोर्चे केले आहेत. तरीही राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. मराठा विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकर भरतीतील मराठा आरक्षणातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ होत आहेत. यापुढे आमच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा. 7 नोव्हेंबरला पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन दुपारी 12 वाजता नामदेव पायरीपासून मराठा आरक्षण पायी दिंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. येथून हा मोर्चा पायी दिंडी करत मंत्रालय येथे पोहचणार आहे. पत्रकार परिषदेस सुनील नागणे, दत्ता मोरे, धनंजय साखळकर, भगवान माकणे आदी उपस्थित होते.
दिंडीचा 30 किमीवर मुक्काम
मोर्चामध्ये कोपर्डीचे अन्यायग्रस्त कुटुंब, 42 युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात त्यांची कुटुंबे तसेच आरक्षणासाठी ज्या युवकांवर गुन्हे दाखल झाले असे 13,700 युवक मास्क लावत सामाजिक अंतर ठेवत सहभागी होतील. रोज पायी दिंडी 30 किलोमीटरवर मुक्काम करेल. तिथे सभा होऊन जनजागृती केली जाणार आहे, अशी मागणी या वेळी महेश डोंगरे यांनी दिली.
(संपादन- बापू सावंत)