esakal | बिहार निवडणूकीसाठी नवी मुंबईतून जाणार भाजपची कूमक; कार्यकर्त्यांची फौज तयार
sakal

बोलून बातमी शोधा

बिहार निवडणूकीसाठी नवी मुंबईतून जाणार भाजपची कूमक; कार्यकर्त्यांची फौज तयार

बिहार राज्यात सुरू असलेल्या निवडणूकींच्या रणधुमळीत नवी मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज लवकरच रवाना होणार आहे.

बिहार निवडणूकीसाठी नवी मुंबईतून जाणार भाजपची कूमक; कार्यकर्त्यांची फौज तयार

sakal_logo
By
सुजित गायकवाड

नवी मुंबई : बिहार राज्यात सुरू असलेल्या निवडणूकींच्या रणधुमळीत नवी मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज लवकरच रवाना होणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदार संघातून सुमारे शंभर कार्यकर्त्यांची एक कूमक निवडणूकांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला पोहोचणार आहे. बिहारला जाऊन येथील प्रचारास मदत करण्यासाठी नवी मुंबईचे भाजप कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

कोरोनाच्या वातावरणातही बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूका सुरू आहेत. सद्या या निवडणूकांचा प्रचार पहिल्या टप्प्यात आला आहे. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. त्याकरीता देशात भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, नेते मंडळी, महामंत्री, संघटक आदी महत्वाची फळी बिहार राज्यातील प्रचारात पोहोचत आहे. मुंबई, ठाणे पाठोपाठ नवी मुंबईतूनही महत्वांच्या नेत्यांची कूमक बिहारला प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. त्याकरीता ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि नेते मंडळींच्या नावांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

सहा महिन्यांपूर्वीच भाजपचे राज्यव्यापी अधिवेशन नवी मुंबईत संपन्न झाले होते. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय कार्यकारणीसह राज्याच्या कार्यकारणीतील नेत्यांचे नवी मुंबईवर विशेष लक्ष आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारला जाणार होते. त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आणि नेते मंडळी जाणार होती. यात नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता फडणवीस बरे होऊन आल्यानंतर पूढे हा दौरा होणार आहे. त्यामुळे आता बिहार निवडणूकांच्या तिसऱ्या अथवा चौथ्या अशा अंतिम टप्प्यात पोहोचण्याची तयारी नवी मुंबईच्या भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.

बिहारच्या निवडणूकांमध्ये प्रचाराला जाण्यासाठी नवी मुंबईचे शेकडो कार्यकर्ते ईच्छूक आहेत. मात्र कोरोनामुळे प्रवासावर असणारी मर्यादा लक्षात घेत काही निवडक कार्यकर्ते आम्ही नवी मुंबईतून घेऊन जाणार आहोत. दोन्ही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची एक फळी घेऊन अखेरच्या टप्प्यातील प्रचाराला पोहोचणार आहोत.
रामचंद्र घरत,
जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई, भाजप

BJPs support to go through Navi Mumbai for Bihar elections Create an army of activists

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image