Aarey Car shed: 'आरे'तच कारशेड होणार; शिंदे फडणवीस सरकारने बंदी उठवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Save-Aarey

Mumbai Metro: 'आरे'तच कारशेड होणार; शिंदे फडणवीस सरकारने बंदी उठवली

मुंबई : मुंबई मेट्रोचे आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे त्यामुळे कारशेड आरे येथे होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

(Aarey Car Shed Update)

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून कारशेडचे काम बंद होते. आता ही बंदी उठवल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा प्रकल्प सुरू होणार अशा चर्चा चालू होत्या.

हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! कोरोनासोबत वाढतोय 'स्वाईन फ्ल्यू'चाही धोका

दरम्यान, महाविकास आघाडीने मेट्रोच्या कार्यकारी संचालक असलेल्या आश्विनी भिडे यांची बदली केली होती पण शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवला होता. त्यामुळे कारशेडचे काम पुन्हा सुरू होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता सरकारने कारशेडवरील बंदी उठवल्यामुळे मार्ग मोकळा झाला आहे.

शिंदे सरकार सत्तेत आल्यावर आदित्य ठाकरे यांनी 'आरे जंगल वाचवा मोहिम' काढली होती. या आंदोलनावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनानंतरही काही पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन केले जाणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं होतं.

Web Title: Aarey Carshed Project Ban Lifted By Eknath Shinde Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..