Abhijit Pawar : व्यवस्थेला प्रश्न विचारणे गरजेचे अभिजित पवार यांचे परखड मत
Question The System : सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार यांनी माजी पिढ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा चर्चेत आणत, वर्तमान व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली. निवडून देण्यात आलेल्या लोकांची क्षमता आणि त्यांचे आश्वासनांचा प्रश्न विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.
मुंबई : ‘‘स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपण पाणी, दुष्काळ, रस्ते, पायाभूत सुविधा याच समस्यांवर चर्चा करतोय. आपण ज्यांना निवडून देतो ती व्यक्ती त्या क्षमतेची आहे का याचा विचार करणे आता गरजेचे आहे.