22 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास परवानगी नाही; वैद्यकिय अहवालाची हायकोर्टाकडून दखल 

सुनिता महामुणकर
Monday, 21 September 2020

बावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे.

मुंबई : बावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. गर्भाच्या वरच्या ओठाची वाढ नैसर्गिकपणे होत नसल्यामुळे गर्भपात करण्याची मागणी करण्यात आली होती.

मराठा आरक्षणात केंद्राने व भाजपने कुंपणावर बसू नये; विरोधकांच्या भूमिकेत राजकारणाचा वास असल्याची अरविंद सावंत यांची टीका

गर्भाच्या ओठावर व्यंग असू शकते मात्र  शस्त्रक्रियेने ते ठीक होईल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत असून आईची प्रकृती ठीक आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. न्यायालयाने या अहवालाची दखल घेतली आणि याचिकादार महिलेला गर्भपात करण्याची परवानगी नाकारली. 

गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार 20 आठवड्याच्या पुढील कालावधीसाठी गर्भपात करावयाचा असल्यास न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. संबंधित प्रकरणात याचिकादार महिला २२ आठवड्यांची गर्भवती आहे. गर्भाच्या वाढीत असाधारण बाबी निर्माण होत आहेत, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होत आहे. म्हणून गर्भपात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. 

सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21 दिवसांत 66 जणांचा मृत्यू  

तज्ज्ञ डौक्टरांनी अहवाल दिल्यानंतरही याचिकादारांकडून इंटरनेटवरील काही वैद्यकीय तपशील दाखल करण्यात आला होता. ओठामध्ये व्यंग असल्यामुळे बोलण्यास त्रास होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावा अमान्य करण्यात आला. वैद्यकीय अहवाल ग्राह्य मानून न्या. नितीन जामदार आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने महिलेची याचिका फेटाळली.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abortion is not allowed for a 22 week pregnant woman