हर हर महादेव! सुमारे दीडशे वर्षानंतर रायगडावरील हत्ती तलाव भरला; संभाजीराजेंकडून कामाची पाहणी

सुनिल पाटकर - (बातमीदार, महाड)
Sunday, 19 July 2020

रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरला असून, गेल्या काही दिवसांपासून तलावांतील पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

महाड : रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरला असून, गेल्या काही दिवसांपासून तलावांतील पाणी ओसंडून वाहू लागले आहे. या ऐतिहासिक क्षणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी रायगडाला भेट दिली. गडावरील रानफुलांनी त्यांनी तलावाचे जलपूजन केले. सुमारे दीडशे वर्षांनंतर हत्ती तलाव पाण्याने भरला असल्याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेतला असल्याचे खासदार संभाजी राजे यांनी सांगितले. रायगड संवर्धनाचे काम सुरू असून, या कामाची पाहणी करण्यासाठी त्याचबरोबर हत्ती तलावाला भेट देण्यासाठी संभाजीराजे यांनी रायगडाला भेट दिली. हत्ती तलावाला तीन ठिकाणी गळती होती; परंतु ही गळती काढण्यात अधिका-यांना यश आल्याने हत्ती तलाव पाण्याने पूर्ण भरलेला दिसत आहे.

नवी मुंबईच्या नव्या आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; कोविड नियंत्रणासाठी कसली कंबर! वाचा सविस्तर

या वेळी त्यांच्याबरोबर महाड बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अविनाश बुरले, प्रधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते. संभाजीराजे यांनी चित्त दरवाजा ते महादरवाजा यामध्ये बांधण्यात आलेल्या पायऱ्या व अन्य कामाची पाहणी केली. मुसळधार पावसामध्ये बांधकामाला कोणतेही नुकसान झाले नसल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रधिकरणासंबंधित प्रत्येक सदस्य, स्थापत्या विशारद, कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान असून, त्यांच्यामुळेच गडावरील काम दर्जेदार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विधी शाखेच्या परीक्षेचा निर्णय बार कौंसिंलच्या कोर्टात; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश

संभाजीराजे यांनी तलावंचे जलपूजन केले. त्यासाठी गडावर आलेल्या रान फुलांचा वापर करण्यात आला. पावसाळ्यामध्ये शिवप्रेमींना गडावर येण्यासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची पाहणी करून संबंधित अधिका-यांना संभाजीराजे यांनी सूचना दिल्या. नाणे दरवाज्या मार्गाने खाली येत असताना मशीद मोर्चापासून पुढील कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पावसाळ्यांनंतर तातडीने करण्याचे त्यांनी सांगितले. नाणे दरवाज्याची कमान कोसळलेली आहे. या कमानीची दुरुस्ती कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर करण्यात येणार आहे.

With the hard work of Shivaji maharajs devotees, the hatti lake at Raigad was filled; Work inspection by Sambhaji Raje

-----------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About one and a half hundred years later, the Elephant Lake at Raigad filled up; Work inspection by Sambhaji Raje