
२४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडण्याचा निर्णय दिला होता. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावर सपा आमदार अबू आझमी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.