घाटकोपर येथे अल्पवयीन मुलावर अत्याचार; बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

अनिश पाटील
Sunday, 29 November 2020

घाटकोपर येथे 13 वर्षाच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.

मुंबई : घाटकोपर येथे 13 वर्षाच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादंवि कलम 377, 506 व 34 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

आशिकी फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका; नानावटी रुग्णालयात दाखल

आरोपी मुले 15, 16 व 17 वयोगटातील आहेत. 23 नोव्हेंबरला आरोपींनी शौचालयाच्या मागच्या बाजूला त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणाची माहिती मुलाने कुटुंबियांना दिल्यानंतर याप्रकरणी तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of a minor in ghatkopar; Filed an offense under the Prevention of Child Sexual Abuse Act