
महेश भट यांच्या 'आशिकी' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता राहुल राॅय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुंबई : महेश भट यांच्या 'आशिकी' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता राहुल राॅय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राहुल राॅय खूप दिवसांनी 'एलएसी लिव्ह द बॅटल' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण कारगिल येथे सुरू होते. तेथे सध्या प्रचंड थंडी असून, तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.
त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रथम श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर तातडीने मुंबई आणण्यात आले. राहुल रॉय यांचे बंधू रुमर सेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहुल रॉय यांची प्रकृती आता सुधारत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
-----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)