ती व्यक्ती संशयित असल्याचे कळताच भीतीने डोंबिवलीकरांनी काही असे केले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

बाधित रुग्णाच्या परिसरातून आलेल्या महिलेस नाकारला प्रवेश

ठाणे : डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे, असे असतानाही त्या परिसरातून एक महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी पूर्वेतीलच आयरे रोड परिसरातील सोसायटीमध्ये गेली होती; परंतू तेथील नागरिकांना महिला आयरे गावातून आल्याचे समजताच त्यांनी तिला सोसायटीत प्रवेश नाकारला. तसेच ती गेल्यानंतर संपूर्ण सोसायटीही धुवून काढली.

'या' तरुणीने केलं असं काही, आता संपूर्ण उल्हासनगरमध्ये होतेय जोरदार चर्चा 

डोंबिवलीतील राजाजी पथ, म्हात्रे नगर, न्यु आयरे रोड, विजय नगर, सहकार नगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी विभाग हे संवेदनशील परिसर सील करण्यात आले आहेत. परिसर सील केले असूनही काही नागरिक त्याचे उल्लंघन करत आहेत. बुधवारी आयरे गावातील महिला आयरे रोड परिसरातील सोसायटीमध्ये तिच्या नातेवाईकांना भेटण्यास गेली होती. आयरे गावात कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे, तसेच विभागही सील करण्यात आला आहे.

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा धोक्यात

याविषयीची माहिती सोसायटीतील नागरिकांना होती. त्यामुळे महिला आयरे गावातून आल्याचे त्यांना समजताच त्यांनी तिला सोसायटीच्या दारातच अडवले. तसेच संचारबंदी असतानाही तुम्ही का फिरत आहात? इतरांचा जीव का धोक्‍यात घालता? असा जाब विचारत त्यांनी महिलेला सोसायटीमध्ये प्रवेश नाकारून  पुन्हा घरी जाण्यास सांगितले. 

साधी पाण्याची वाफ घ्या, पण अति करू नका, कारण...

बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. कधी, कोठून, कसा तो विषाणू पसरेल, याची खात्री नसल्याने आपणच आपली खबरदारी घेतली पाहीजे. काही नागरिक त्यास अपवाद असून ते अजूनही घराबाहेर फिरत आहेत; परंतू आता आम्ही सोसायटीमध्ये इतर प्रभागातील कोणाला येवूच देणार नाही. सोसायटीमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत. त्यामुळे आम्ही इतर बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी केली असल्याचे सोसायटीतील नागरिकांनी सांगितले.

Access denied to a woman from Dombivali affected area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Access denied to a woman from Dombivali affected area