साधी पाण्याची वाफ घ्या, पण अति करू नका, कारण...

साधी पाण्याची वाफ घ्या, पण अति करू नका, कारण...

मुंबई: कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव संपूर्ण जगात बघायला मिळत आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आता जगात कोरोनपासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उपाय सुचवले जात आहेत. त्यात एक उत्तम उपाय म्हणजे स्टीम थेरपी, म्हणजेच वाफ घेणे असं बोललं जातंय. 

वाफ घेतल्यानं कोरोना बरा होतो असं अनेकांकडून सांगण्यात येतंय. कोरोनाचे प्रमुख लक्षणं म्हणजे ताप सर्दी खोकला आणि न्यूमोनिया. वाफ घेतल्यामुळे सर्दी किंवा कफ तुमच्या शरीरात राहत नाही आणि कोरोना असेल तर तो निघून जातो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र वाफ घेतल्यानं खरंच कोरोना बारा होतो का याच्यामागचं सत्य आणि असत्य आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या काही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे.  

काही फळभाज्या आणि पालेभाज्या खाल्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता वाढते हे तुम्ही ऐकलं असेल. मात्र स्टीम थेरपीदरम्यान शरीरात होणाऱ्या उष्णतेमुळे कोरोनापासून बचाव करता येतो असं काही लोकांचं म्हणणं आहे.    

काही लोकांमध्ये हर्ब्सची वाफ घेण्याचं आकर्षण आहे. यात वाफ घेताना त्या गरम पाण्यात लिंबू,संत्र, लसूण यांचे साल गरम पाण्यामध्ये टाकतात. याला हर्ब्स स्टीम थेरपी म्हणतात. हे सगळे हर्ब्स अँटिमायक्रोबियल असतात जे तुमच्या शरीरातले व्हायरस मारण्यात तुम्हाला मदत करत असतात.

काही लोकंच्या मते रोज १५-२० मिनिटं वाफ घेतली पाहिजे त्यानं कोरोनापासून बचाव करता येतो. मात्र Disease Control and Prevention (CDC) आणि World Health Organization (WHO) नं या दाव्यांना खोटं ठरवलं आहे. स्टीम थेरपीमुळे कोरोना बरा होतो असे कुठलेही दावे खरे नाहीत असं WHO नं देखील म्हंटलं आहे.

The Journal Of The American Medical Association (JAMA) च्या एका रिपोर्टनुसार स्टीम थेरपी म्हजेच वाफ घेतल्यानं कफ किंवा सर्दी पूर्णपणे बरी होत नाही. वाफ घेणारे आणि वाफ न घेणाऱ्यांमध्ये तुलना केली तर वाफ घेणाऱ्यांची सर्दी लवकर बारी झालीये. 

दरम्यान डॉक्टर सर्दी किंवा कफ झाला की वाफ घेण्याचा सल्ला देतात. कारण वाफ घेतल्यामुळे तुमच्या नाकातला आणि गळ्यातला म्युकस ज्यामुळे कफ तयार होतो तो पातळ होतो. तसंच तुमच्या शरीरात कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं  त्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता येतो.

सध्या सोशल मीडियावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी वाफ घ्या असे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र वाफ घेण्याचे काही दुष्परिणामही आहेत:

  • जास्त वेळ वाफ घेतल्यामुळे तुमच्या शरीरात अतिउष्णता तयार होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आतड्यांना त्रास होऊ शकतो.
  • जास्त तापमानावर वाफ घेतल्यामुळे तुमच्या शरीराला हानी होऊ शकते.
  • अति वाफेमुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.
  • तुमच्या गळ्यातले टिशू बर्न होण्याची शक्यता असते.
  • तुमच्या चेहऱ्यावर आणि गालावर लालसर चट्टे येऊ शकतात.
  • जास्त वेळ वाफ घेतल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
  • त्यामुळे या वाफ घेण्याचा उलट परिणामही तुमच्या शरीरावर होऊ शकतो.

why taking too much of steam is harmful for your body read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com