Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटनेरमध्ये घुसली, दोघे जागीच ठार

Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटनेरमध्ये घुसली, दोघे जागीच ठार

Poladpur News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकरनगरसमोर कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या कारने कंटेनरला मागून धडक दिली. यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुटीसाठी मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या कारने मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ आंबेडकरनगरजवळ कंटनेर उभा होता. या वेळी अनिल भीमा शिंदे यांची कार कंटनेरच्या मागील भागात भरधाव वेगात घुसली. कंटेनरच्या मागील बाजूस अर्धी कार आत घुसल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले.

Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटनेरमध्ये घुसली, दोघे जागीच ठार
Nashik-Pune Highway : शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संघर्ष करणार; पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

तर तीन जण गंभीर जखमी झाले. चालक अनिल भीमा शिंदे (वय ४०, रा. पुणे) व सुमती यशवंत शिंदे (वय ७५) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. नीलेश अनंत दळवी, जान्हवी नीलेश दळवी (४५), यश नीलेश दळवी (१८) सर्व राहणार खानवली, लांजा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटनेरमध्ये घुसली, दोघे जागीच ठार
National Highway : धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर बेदरकार हायवा ट्रक ठरतेय यमदुत

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेस्क्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटनेरमध्ये घुसली, दोघे जागीच ठार
Old Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com