Fatal accident on Mumbai-Goa roadsakal
मुंबई
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर डम्परला कार धडकली, दोघांचा जागीच मृत्यू
Dumper accident Mumbai-Goa : क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात आली.
Latest Mangaon News: मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलाखाली कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एम. एच. १६, बी. एच. ४८२९ या कारमधून तीन जण महाड वाहिनीवरुन मुंबईकडे प्रवास करीत होते. मौजे वावेदिवाळी गावच्या हद्दीत ही कार आली असता या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गावरून पुलाच्या खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.