
पाली, ता. 11 (वार्ताहर) वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर अपघाताची मालिका कायम सुरूच आहे. या मार्गावर शनिवारी (ता.11) पहाटे चार वाजताच्या सुमारास दुरशेत गावानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रिक्षाचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.