
मुंबई : CM एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील कारला अपघात!
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना अपघात झाल्याचं वृत्त आहे. मुंबई महापालिकेजवळ हा किरकोळ अपघात झाला यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Accident of CM Eknath Shinde convoy at Mumbai near BMC Headqurter)
हेही वाचा: CM शिंदे म्हणतात, रिक्षाच्या स्पीडपुढं मर्सिडीजचा स्पीड फिका पडला; कारण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर ते पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागू जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकानं इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानं हा प्रकार घडला.
पुढची कार अचानक थांबल्यानं मागच्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती पुढच्या कारवर आदळली. परंतू या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Web Title: Accident Of Cm Eknath Shinde Convoy At Mumbai Near Bmc Headquarter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..