Accident: नवी मुंबईत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Swiggy Delivery Boy: खारघरमध्ये कचरा गाडीच्या धडकेत स्विगी डिलीव्हरी बॉयचा मृत्यू
 नवी मुंबईत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Accidentsakal

Navi Mumbai News: सायन-पनवेल मार्गोवर तसेच जेएनपीटी-पनवेल मार्गावर सोमवारी एका दिवसामध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खारघर येथे झालेल्या अपघातात पनवेल माहापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत स्विगी डिलीव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे.

सायन पनवेल मार्गावरील सानपाडा येथील दत्त मंदिराजवळ सोमवारी दुपारी 12.30 वाजता झालेल्या अपघातात डंपर चालक हुसेन खान हामिद खान पठाण (31) याचा मृत्यू झाला. हुसेन खान हा अनिल मंगरु उरौव (26) याच्यासोबत तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गाव येथे डेब्रिज टाकण्यासाठी गेला होता.

 नवी मुंबईत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Accident News : दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार

त्यानंतर तो वाशी येथे परतत असताना, सानपाडा येथील पुलावरील उतारावर चालक हुसेन खान याचे डंपर वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर डंपर रस्ता दुभाजकाला धडकल्याने डंपर चालक हुसेन खान हा खाली पडुन गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सानपाडा पोलिसांनी मृत डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता खारघर येथुन रोडपाली येथे दुचाकीवरून स्विगी डिलीव्हरी घेऊन जाणाऱ्या अंजनीकुमार तुलाधारी मौर्या (22) या तरुणाला सायन पनवेल मार्गावर खारघर येथील हिरानंदानी चौकात पनवेल महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने धडक दिली.

या अपघातात कचऱयाच्या गाडीने अंजनीकुमार याला काही अंतर फरफटत नेल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा काही वेळाच मृत्यू झाला. या अपघातानंतर खारघर पोलिसांनी कचऱयाची गाडी चालवणाऱया विकास पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

 नवी मुंबईत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Nashik Fire Accident : सौंदाणे येथे गढकलिका व्यापारी संकुलास आग

तर जेएनपीटी पनवेल मार्गावर रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या तिसऱया अपघतात भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकी चालक नरेंद्र वामनराव विनायते (37) याचा मृत्यू झाला. उलवे येथे राहणारा नरेंद्र विनायते हा रात्री आपल्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलवरुन उलवे येते जात होता.

यावेळी भरधाव ट्रेलरने त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. उरण पोलिसांनी या अपघातातील ट्रेलर चालक जहीर सिराजुल अली याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

 नवी मुंबईत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Nashik Accident News: दर्गाच्या दर्शनासाठी जाणारा कारच्या धडकेत एक ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com