वाहनामध्येच घराची सोय; पर्यटनाला चालना देण्यासाठी मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ

भाग्यश्री भुवड
Sunday, 6 September 2020

कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला पुनुरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 'मोटोहोम कॅम्परव्हॅन' या अनोख्या सेवेचा शुभारंभ केला आहे.

मुंबई : कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला पुनुरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 'मोटोहोम कॅम्परव्हॅन' या अनोख्या सेवेचा शुभारंभ केला आहे.  ही कॅम्परव्हॅन स्वयंपाकघर, एक मिनी बेडरूम, लिव्हिंग रूम आणि टेरेससारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे पर्यटक हाॅटेल बुक न करता राज्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात. 

रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर प्रवासासाठीदेखील आरोग्याच्या दृष्टीने कॅम्परवॅन हा एक प्रभावी उपाय आहे. पर्यटक कॅम्परव्हॅन भाड्याने घेऊ शकतात किंवा एकामध्ये गुंतवणूक करू शकतात. वाहनामध्ये कचरा व्यवस्थापनाचीही व्यवस्था आहे. यामुळे प्रवासादरम्यान पर्यटकांना हॉटेल्स किंवा रेस्टाॅरंट बुक करण्याची गरज राहणार नाही. पर्यटकांना घरापासून दूर एक सर्वसोयीयुक्त घरच यामुळे उपलब्ध झाले आहे, असे एमटीडीसीतर्फे सांगण्यात आले आहे. 
ज्यांना स्वतंत्रपणे फिरून महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेटी द्यायच्या आहेत. त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यास एमटीडीसी प्रयत्नशील आहे, असे यावेळी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणेः)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accommodation in the vehicle itself; Launch of Motohome Campervan to boost tourism