बंगल्यातील बांधकाम नियमानुसार; कंगनाचा उच्च न्यायालयात पुनरुच्चार

सुनिता महामुणकर
Tuesday, 22 September 2020

पाली हिल येथील बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.

मुंबई : पाली हिल येथील बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला मुंबई महापालिकेने पक्षपातीपणा करून नोटीसीबाबत सात दिवस मुभा दिली होती, असा दावाही तिने केला आहे.

22 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास परवानगी नाही; वैद्यकिय अहवालाची हायकोर्टाकडून दखल 

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयात केलेल्या   बांधकामावर 24 तासांची नोटीस देऊन तोडले आहे. याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणीही तिने केली आहे. महापालिका जाणीवपूर्वक माझ्या विरोधात कारवाई करीत आहे. नियमांचे उल्लंघन केले नाही, असे तीने म्हटले आहे. फॅशन डिझायनर मल्होत्रालाही महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र त्याला सात दिवस अवधी दिला. त्यामुळे माझ्या काही विधानांमुळे व्यक्तिशः पालिका आकसाने कारवाई करत आहे, असे सोमवारी केलेल्या पुरवणी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

आज पुन्हा सुनावणी
कंगनाने नियमबाह्य काम केले असून कायद्याचा गैरवापर करत असल्याबद्दल तिच्या कडून दंड वसूल करा, असे महापालिकेने म्हटले आहे. उद्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to the construction rules of the bungalow Kangana reappears in High Court