Palghar : शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकांची खाते निहाय चौकशी सुरू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

palghar

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकांची खाते निहाय चौकशी सुरू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा :   मोखाडा पोलीस ठाण्यातील गणेश तारगे व मंगेश मुंढे या दोन पोलीस उपनिरीक्षकांनी आदिवासी शेतकर्यांची लुबाडणूक केल्याची बाब श्रमजीवी संघटनेच्या मोर्चात उघडकीस  आली आहे. लुबाडलेली काही रक्कम, त्यांनी पुन्हा शेतकर्यांना परत केली आहे. त्याविषयी आमदार सुनिल भुसारांनी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. त्याची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी या दोन्ही अधिकार्यांच्या तातडीने बदल्या केल्या आहेत. तसेच या घटनेची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले  आहेत. त्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक कलगोंडा हेगाजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.            

मागील आठवड्यात मोखाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे व मंगेश मुंढे यांनी काही आदिवासी शेतकर्यांची खाकी वर्दीचा धाक दाखवून लुबाडणूक केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे यांनी आपण सदरचे कृत्य केल्याची कबुली देत काही शेतकर्यांकडुन घेतलेले पैसे त्यांना परत केले आहे. या घटनेतील दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुनिल भुसारांनी, पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली होती.

हेही वाचा: 'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

मोर्चा आणि आमदारांच्या पत्राची दखल घेत पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी गणेश तारगे व मंगेश मुंढे या दोन्ही पोलीस उपनिरिक्षकांच्या तातडीने तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. तसेच खाते निहाय चौकशींचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कलगोंडा हेगाजे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी मी मोखाड्यात येऊन चौकशी करत आहे. घटनेचा चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येणार आहे.

कलगोंडा हेगाजे, पोलीस उपअधीक्षक,

आर्थिक गुन्हे शाखा, पालघर.

loading image
go to top