
मलेरियाचे अचूक निदान करणे आता शक्य होणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल तयार केले आहेत.
मलेरियाचे अचूक निदान शक्य, कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल ठरणार वरदान
मुंबई: मलेरियाचे अचूक निदान करणे आता शक्य होणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी देशातील तीन रुग्णालयांच्या सहकार्याने प्रोटीओमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल तयार केले आहेत. ज्यामुळे दोन प्रकारच्या मलेरियाचे निदान करणे शक्य होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मॉडेल मानवी रक्तातील प्रथिनांच्या बदलत्या प्रवृत्तीवर आधारित मलेरियाच्या दोन प्रजातींचे रोगनिदान करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे मलेरियाच्या दोन प्रमुख प्रजाती पी फाल्सीपरम आणि पी व्हिव्हॅक्स मद्ये फरक करण्यास मदत होऊ शकेल. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून आर्थिक मदत देण्यात आली असून त्यांचा अभ्यास आणि निष्कर्ष नोव्हेंबरमध्ये कम्युनिकेशन्स बायोलॉजी नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
प्रकल्पाचा भाग म्हणून संशोधकांनी फाल्सीपेरम मलेरिया, व्हिव्हॅक्स मलेरिया आणि डेंग्यूच्या गंभीर आणि सौम्य रुग्णांसह तसेच निरोगी लोकांकडून रक्ताचे नमुने गोळा केले. हे नमुने कोलकाताच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सरदार पटेल मेडिकल कॉलेज, बीकानेर, एल.एच.एच. हिरानंदानी हॉस्पिटमध्ये नमूने संकलित केले होते.
अधिक वाचा- बाळासाहेब थोरात राजीनामा देणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
त्यानंतर या नमुन्यांचे विश्लेषण करून त्यांची नोंद करण्यात आली. “भारतात मलेरियाच्या आजाराचे प्रमाण अधिकतर बांधकाम स्थळांवरील कामगार, ड्रेनेजची व्यवस्था नसलेले प्रदेश, जागृत नसेलेले ठिकाणं आणि पावसाळ्यात अधिक आहे असे बायोसायन्स आणि बायोइन्जिनियरिंग विभाग, आयआयटी-बी या संशोधन संस्थेच्या संशोधन सहकारी शालिनी अग्रवाल म्हणाल्या.
मलेरियाचे निदान करण्यासाठी प्रमाणित पद्धती म्हणजे परजीवी आढळण्यासाठी
संशयित रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. तथापि, ते संसर्गाच्या रोगनिदानात मदत करू शकत नाही. निदानाच्या इतर मार्गांमध्ये वेगवान डायग्नोस्टिक्स टेस्ट (आरडीटी) आणि न्यूक्लिक ऍसिड एम्पलीफिकेशन (एनएए) समाविष्ट आहे.मलेरियाच्या बाबतीत, पी फाल्सीपेरम, पी व्हिव्हॅक्स आणि इतर प्रजाती आरडीटी वापरुन वेगळ्या करता येत नाहीत. त्या सुक्ष्मदर्शकासह रक्ताच्या 100 फील्ड्स पाहण्यासाठी तज्ञांच्या डोळ्याची आवश्यकता असते असे ही अग्रवाल यांनी पुढे सांगितले.
"मलेरियाच्या हंगामात, रुग्णांची संख्या जास्त असते आणि परिणामी डॉक्टरांच्या हातांनी रोगनिदान करण्याचे काम वाढते. अशा वेळी नव्या पद्धतीचा वापर केल्यास मलेरियाचे वेळेत निदान आणि उपचार केल्यास ते कार्यक्षम ठरू शकतात" असे संशोधक, संजीव श्रीवास्तव, प्रोफेसर, बायोसायन्स विभाग आणि बायोइन्जिनियरिंग विभाग, आयआयटी-मुंबई यांनी सांगितले.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
“किटचा उपयोग प्रोटीनच्या पॅनेल संकलित करण्यासाठी निदान आणि रोगनिदान कार्यांसाठी केला जाऊ शकतो. एकदा हा नमुना तयार झाल्यावर आम्ही सध्या वापरलेल्या आरडीटी किट्ससह किटची तुलना करू. आमच्या अभ्यासामध्ये प्रोटीन पॅनेलचा समावेश असल्याने खोटे-पॉझिटिव्ह आणि खोटे-नकारात्मक निकाल कमी करण्यात मदत होईल, ”असे अग्रवाल यांनी नमूद केले.
-----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Accurate diagnosis malaria possible Researchers IIT Mumbai developed models