वांद्रे-वरळी सि-लिंक अपघातातील एक आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

दसऱ्याच्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वांद्रे-वरळी सी-लिंकवर चार कार आणि अ‍ॅम्ब्युलन्सची धडक झाली, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

वांद्रे-वरळी सि-लिंक अपघातातील एक आरोपी अटकेत

मुंबई - दसऱ्याच्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वांद्रे-वरळी सी-लिंकवर चार कार आणि अ‍ॅम्ब्युलन्सची धडक झाली, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका एसयूव्ही गाडी चालकाला अटक करण्यात आली आहे. इरफान अब्दुल रहीम बेलकिया असे आरोपी चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसयूव्ही चालकाला अटक

5 ऑक्टोबर रोजी वांद्रे वरळी सी लिंकवर तीन अन्य कार आणि रुग्णवाहिकेला धडक देणाऱ्या एसयूव्हीच्या चालकाला मुंबई पोलिसांनी गुरुवारी 6 ऑक्टोबर rojibअटक केली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, किमान आठ जण जखमी झाले आहेत. इरफान अब्दुल रहीम बेलकिया असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात कसा झाला?

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर बुधवारी रात्री प्रथम एका वाहनाचा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. रुग्णवाहिका जखमींना घेऊन जाण्यापूर्वीच मागून येणाऱ्या 3 वाहनांनी रुग्णवाहिकेला धडक दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांना स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागली. या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांना वाचवण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याशिवाय पोलिसांनी आता या घटनेचा तपास करत आहेत.