तारापुर - डहाणू येथे घडलेल्या कथित लव्ह जिहाद आणि अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती..डहाणू पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका २२ वर्षीय तरुणाने एका युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. तसेच त्या व्हिडिओंच्या आधारे संबंधित युवतीला ब्लॅकमेल करत तिच्या अल्पवयीन लहान बहिणीवरही अत्याचार केल्याची गंभीर बाब तक्रारीत नमूद करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे डहाणू पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता..प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप नेत्या व आमदार यांनी डहाणू पोलीस ठाण्याला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली होती. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती..दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र डहाणू पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबवत परराज्यातून आरोपीला मंगळवार, ९ जून रोजी बलात्काराच्या आरोपाखालील २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात यश मिळविले. पोलिसांनी आरोपीला पालघर न्यायालयात हजर केले असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस करीत असून आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने अधिक तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.