कोरोना अधिकारी असल्याची बतावणी करत घातला असा काही 'गंडा' की वाचून तुम्हीही चक्रावालं

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

अब्दुल याकूब शेख (वय 49) हे 30 जून रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास सरस्वती विद्यालय मार्ग क्रमांक 11 वरून चेंबूर रेल्वे स्थानकाकडे जात होते.

चेंबूर (बातमीदार) : कोरोना अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला लूटणाऱ्या फरार आरोपीस चेंबूर बसंत पोलिसांनी अटक केली आहे. सोहन गणेश वाघमारे असे या आरोपीचे नाव आहे. 

हे ही वाचा : पॅसेजमध्येच रुग्णांना ऑक्सिजन; डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...

चेंबूरच्या लाल डोंगर येथे रहाणारे फिर्यादी अब्दुल याकूब शेख (वय 49) हे 30 जून रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास सरस्वती विद्यालय मार्ग क्रमांक 11 वरून चेंबूर रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी अचानक त्या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन आपण कोरोना अधिकारी असल्याचे सांगत शेख यांची कागदपत्र असलेल्या बॅगेची तपासणी करून त्यातील कॅनरा बँकेचे एटीएम व त्या पिन नंबर हातचलाखीने मिळवला, त्यानंतर एटीएममधून 54 हजार रुपये काढत शेख यांची फसवणूक केली. या फसवणुकीबाबत फिर्यादी शेख यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.

नक्की वाचा दवाखाना नको रे बाबा! घरीच करतो तपासणी! ऑक्सिमीटर, थर्मामीटरसाठी सर्वाधिक गूगल सर्च

त्यानुसार चेंबूर बसंत पोलीसांनी आरोपी विरोधात कलम 420, 34 भादवी अन्वये गुन्हा करत तपासास सुरुवात केली. त्यानंतर सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून गुन्हयात वापरण्यात आलेल्या गाडीच्या आधारे त्यांनी आरोपी सोहन यांस अटक केली. दरम्यान त्याचा साथीदार अद्याप ही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

accused arrested for robbing a man by pretending to be a Corona officer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused arrested for robbing a man by pretending to be a Corona officer