बॉम्बस्फोटातील 'हा' आरोपी भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर 

वैदेही काणेकर
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

  • केंद्र सरकारच्या निर्णयावरून वाद
  • प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत स्थान
  • मालेगाव स्फोटात आहेत प्रज्ञा ठाकूर आरोपी

खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चक्क संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान दिल्यानं सध्या देशभर चर्चांना उधाण आलंय..होय, या त्याच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत, ज्यांच्यावर मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे.

आता आपण ही समिती पाहू...

या समितीत एकूण 21 सदस्य आहेत..या समितीचे अध्यक्ष संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत. मात्र, त्यांच्यासह विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही स्थान मिळालंय..त्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख  अब्दुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे..GFX OUT मात्र, इतकी महत्त्वाची समिती असताना, त्या समितीत अत्यंत गंभीर आरोप  असलेल्या व्यक्तीचा समावेश करणं, कितपत योग्य, असा सवाल आता केला जाऊ लागलाय.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात आलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक संघटनांमध्ये काम केलंय..मालेगावात 2008 मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 10 जण ठार झाले होते तर 82 जखमी झाले होते. घटनास्थळी त्यांची बाईक सापडल्यानंतर त्यांच्यावर दहशतवादाची कलमं लावली होती..
मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला आणि त्यानंतर एनआयएनं त्यांच्यावरचे गंभीर आरोपही मागे घेतले..यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढताना त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला.

प्रज्ञा ठाकूर यांना जनतेनं निवडून दिलंय..मात्र, त्यांच्यावर असलेले गंभीर आरोपही दुर्लक्षून चालणार नाही..तेव्हा सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

Webtitle : this accused is now member of inidias parliamentary consultative committee of defence 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this accused is now member of inidias parliamentary consultative committee of defence