Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crime sakal

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

मटका किंग संदीप गायकवाड याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या व दीड वर्षापासून मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर या आरोपीला उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिसांनी गुजरात मध्ये फिल्डिंग लावून जेरबंद केले आहे.
Published on

उल्हासनगर : मटका किंग संदीप गायकवाड याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या व दीड वर्षापासून मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर या आरोपीला उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिसांनी गुजरात मध्ये फिल्डिंग लावून जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे 2020 मध्ये हितेंद्र ठाकूर याने श्रीराम चौकातील डान्सबार समोर मटका किंग संदीप गायकवाड याच्यावर गोळीबार केला होता.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी ठाकूर याला अटक केल्यावर आणि तो जेलमधून बाहेर आल्यावर त्याने गायकवाड याचा मुलगा प्रथम हा 9 डिसेंबर 2022 रोजी सी.ब्लॉक येथील राहत्या घराच्या परिसरात उभा असताना मोटरसायकल वरून आलेल्या हितेंद्र ठाकूर,राहुल पगारे,अजय बागुल,योगेश वाघ यांनी प्रथमच्या मानेवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता.त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला होता.याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी राहुल पगारे,अजय बागुल,योगेश वाघ याना अटक केली होती.मात्र हितेंद्र उर्फ हितेन ठाकुर हा फरार झाला होता.

Ulhasnagar Crime
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

ठाकूर हा आंध्रप्रदेश,कर्नाटक,तामिळनाडु,गुजरात,राजस्थान,मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश याठिकाणी सिमकार्ड बदलून वास्तव्य करून आपले अस्तित्व लपवुन राहत होता.त्यामुळे कौशल्यपुर्वक व तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाकुरचा ठावठिकाणा मिळवने पोलीस पथकाला कठीण जात होते.

मात्र त्याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून टाकलेल्या पोस्टमुळे तो फसला.ठाकूर हा गुजरात वापी येथील कांचननगर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे,पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस,सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मालशेटे,पोलीस हवालदार प्रविण जाधव,प्रविण पाटील,विलास जरग,महेश बगाड,सुशांत हांडे देशमुख, प्रविण इंगळे यांच्या पथकाने वापी मध्ये सापळा रचल्यावर हितेंद्र ठाकूर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.

शनिवारी त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कष्ठाडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नारपोली पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व चोरीचे एकुण 5 गुन्हे व पडघा पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचे 2 गुन्हे दाखल होते.श्रीराम चौकात डान्सबार बाहेर संदीप गायकवाड वर झालेल्या गोळीबार प्रकरणात हितेंद्र ठाकूर याला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली होती.अशी माहिती मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com