
मुंबई, ता. 20 : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या खटल्यात दोषी ठरलेल्या आरोपीने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून अभिनेता आरोपी संजय दत्तची कोणत्या निकषांवर सुटका झाली, याचा तपशील मिळण्यासाठी ही याचिका करण्यात आली आहे.
मागील तीस वर्षांपासून ४८ वर्षीय आरोपी ए जी पेरारीवलन उर्फ अरीवू कारागृहात आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याला न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली आहे. गांधी यांची हत्या करण्यासाठी अतिरेक्यांनी वापरलेल्या मानवी बॉम्बची बॅटरी अरीवूने केल्याचा आरोप आहे. या दोन बॅटऱ्या नऊ व्होल्टेजच्या होत्या. मात्र या बॅटऱ्या कशासाठी वापरणार होते याची माहिती नव्हती, असा बचाव त्याने केला होता.
संजय दत्तवर एके 47 जवळ बाळगल्याचा आरोप होता. मात्र हत्यारे मुंबई मध्ये कशासाठी आणण्यात आली याची माहिती त्याला नव्हती, असा बचाव त्याच्या वतीने करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने सहा वर्षे शिक्षा सुनावली होती. येरवडा कारागृहात तो होता. चांगले वर्तन आणि पॅरोल नियमानुसार त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती.
माझा आणि संजय दत्तचा खटला सारखाच आहे, त्यामुळे त्याची माहिती मला द्यावी, असा अर्ज त्याने सन 2016 मध्ये केला होता. मात्र अद्याप त्याचा अर्ज मंजूर झाला नाही. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर नुकतीच न्या के के तातेड आणि न्या रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य माहिती आयोगाला नोटीस बजावली आहे. याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
mumbai news accused of rajiv gandhi murder case filed petition to get info about how sanjay dutt case was fought
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.