२१ वर्षांनंतर त्याला झाली अटक; केलं होतं कृत्य...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

बिहारच्या पाटणा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अधिकाऱ्याच्या मुलाची खंडणीसाठी हत्या करून फरारी असलेल्या आरोपीस २१ वर्षांनी नवी मुंबईतून बुधवारी (ता.१९) अटक करण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

मुंबई : बिहारच्या पाटणा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अधिकाऱ्याच्या मुलाची खंडणीसाठी हत्या करून फरारी असलेल्या आरोपीस २१ वर्षांनी नवी मुंबईतून बुधवारी (ता.१९) अटक करण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. साजिद अब्दुल रशीद अरई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - परदेशी नागरिकाच्या पोटात दीड कोटींचे घबाड

मुनेश्‍वर रामावतार हे पाटणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचा अमित हा मुलगा १९९९ मध्ये मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यानच्या काळात अमितची आरोपी साजिद याच्याशी ओळख झाली होती. अमितचे कुटुंबीय श्रीमंत असल्याचे साजिदला समजले. त्याने अमितचे अपहरण करून खंडणी उकळण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने सिराज मुजावर या मित्राची मदत घेतली होती. त्यांनी ५ एप्रिल १९९९ रोजी अमितचे अपहरण करून वडिलांकडे ७० लाख रुपयांची मागणी केली होती. 

हेही वाचा - कलिंगड उठावाअभावी पडून 

मुनेश्‍वर यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, १० एप्रिलनंतर अपहरणकर्त्यांचा फोन न आल्याने त्यांनी १४ एप्रिलला सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अमितच्या अपहरण आणि खंडणीसाठी धमकी आल्याची तक्रार नोंदवली. पोलिस तपासात या गुन्ह्यांत साजिदसह इतर एका तरुणाचा सहभाग उघडकीस आला, दरम्यान, एका बॅगचोरीचा रेल्वे क्राईम ब्रॅंच तपास करीत होते. त्यासाठी श्रीवर्धन आणि खारघर परिसरात शोधमोहीम राबवताना बुधवारी साजिदला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला.

हेही वाचा - सरकारी कर्र्मचाऱ्यांना धसका

मृतदेह खाडीत फेकला 
पोलिस तपासात साजिदने सिराजच्या मदतीने अमितचे अपहरण करून त्याला पाच दिवस वसई, नालासोपारा आणि विरार येथे फिरविले. दुसरीकडे ते त्याच्या वडिलांना फोन करून पैशांची मागणी करीत होते; मात्र पैसे देण्यास त्यांनी उशीर केल्याने त्यांनी अमितची रॉडने मारहाण करून हत्या केली आणि मृतदेह वसई योथील खाडीत फेकून पुरावा नष्ट केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused was arrested after 21 years for the murder of the officer's son in bihar navi mumbai