तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणी आरोपीची जन्मठेप कायम

सुनिता महामुणकर
Saturday, 24 October 2020

तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम आरोपी दयेस पात्र नाही, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने 27 वर्षे वयाच्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे

मुंबई : तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम आरोपी दयेस पात्र नाही, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने 27 वर्षे वयाच्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. पीडित मुलीची उलटतपासणी नोंदविण्यात आली नाही, हा युक्तिवाद आरोपी सुदाम शेळकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. मात्र, न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद नामंजूर केला. 

मुंबईतून हिरेदागिने निर्यातीत वाढ; अमेरिका युरोपात भारतीय हिरे उद्योगाची आगेकूच कायम

लहान मुलांना त्यांच्यासोबत काय होत असते, हेच बहुतांश वेळा समजत नसते. त्यामुळे झालेल्या घटनेबद्दल तिने काही सांगण्याची आवश्‍यकता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच, पोलिसांनी दाखल केलेले घटनात्मक पुरावे आरोपीला शिक्षा ठोठावण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची सजा कायम होत आहे, असे न्यायालय म्हणाले. आरोपीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाला नाही, असेही यावेळी आरोपीकडून मांडण्यात आले. हा दावाही खंडपीठाने फेटाळला.

राज्यातील ऑनलाईन परीक्षांवर सायबर हल्ल्याचा संशय; चौकशीसाठी समिती स्थापन

आरोपी प्रौढ असून अशा गुन्ह्यात घ्यायची सावधगिरी त्याने घेतली असावी. लहान मुलींवर अशाप्रकारचा घृणास्पद प्रकार करणे हाच गुन्हा शिक्षा करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो, असा खुलासा न्यायालयाने केला. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारामध्ये या प्रकरणी हा गुन्हा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही न्यायालय म्हणाले. अशा आरोपींना कोणत्याही सबबीखाली दिलासा देता कामा नये आणि बचावासाठी केलेले युक्तिवाद मान्य करू नयेत, या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सहमती दर्शवत याचिका फेटाळली. 

Accuseds life sentence upheld in case of Minor Tyranny

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accuseds life sentence upheld in case of Minor Tyranny